Anushka Tapshalkar
दिवसभर फिरल्यानंतर धूळ, घाण, जंतू यांच्या संपर्कात येऊन पायांवर अनेक प्रकारचे किटाणू साचतात. रात्री झोपण्याआधी पाय धुतल्याने पाय स्वच्छ होतात आणि त्वचा ताजीतवानी होते.
दिवसभराच्या घामामुळे पायांना दुर्गंधी येऊ शकते, जी झोपताना त्रासदायक ठरते. नियमित रात्री पाय धुतल्याने हा वास कमी होतो आणि शांत झोप लागते.
गरम किंवा कोमट पाण्याने पाय धुतल्याने पायातील स्नायू सैल होतात आणि रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते, ज्यामुळे संधिवात किंवा पायदुखी असणाऱ्यांना आराम मिळतो.
दिवसभर काम, चालणे किंवा उभे राहिल्यामुळे पायांवर मोठा ताण येतो. रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्याने पाय धुतल्याने आराम मिळतो, शरीर हलके वाटते आणि थकवा दूर होतो.
झोपण्याआधी पाय धुतल्याने शरीराला थंडावा मिळतो, मन शांत होते आणि गाढ झोप लागण्यास मदत होते.
पाय सतत ओले किंवा घामट राहिल्यास संसर्ग होऊ शकतो. झोपण्याआधी स्वच्छ पाण्याने पाय धुतल्याने हा धोका कमी होतो आणि त्वचा निरोगी राहते.
थंड किंवा कोमट पाण्याने पाय धुतल्याने शरीर शांत होते, विशेषतः थंड पाणी वापरल्यास मानसिक ताणतणाव कमी होतो आणि झोपण्यापूर्वी मन प्रसन्न वाटते.
आयुर्वेदानुसार, झोपण्याआधी पाय धुतल्याने शरीरातील दोष संतुलित ठेवण्यास मदत होते, विशेषतः उष्णता नियंत्रित करण्यास आणि मेंदूला विश्रांती देण्यास हे उपयुक्त ठरते.
आरामदायक झोपेसाठी पाण्यात थोडे मीठ किंवा सुगंधी तेल मिसळा, यामुळे आणखी आराम मिळतो व झोपेत कोणताही अडथळा येत नाही.