सकाळ डिजिटल टीम
आयुर्वेदा मध्ये लवंगाला आधीक महत्व असल्याचे सांगीतले जाते.
लवंगाचे सेवन केल्याने शरीरीला अनेक आरोग्यकारक फायदे मिळतात.
लवंगाचे सेवन केल्याने आरोग्यास कोण कोणते आयुर्वेदीक फायदे मिळतात जाणून घ्या.
लवंगाचा वापर नैसर्गिक माऊथ फ्रेशनर म्हणून करता येतो, कधी कधी तोंड साफ न केल्याने तोंडाला दुर्गंधी येते.
लवंगामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, म्हणून रोज सकाळी लवंग चावून खाल्ल्यास तोंडातील जंतू मरतात आणि तोंडाची दुर्गंधी निघून जाते.
लिव्हर हा आपल्या शरीराचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे, लवंग खाल्ल्याने लिव्हरचे आरोग्य सुधारता येते.
जर तुम्हाला अचानक दात दुखण्याचा त्रास होत असेल तर, दाताजवळ लवंगाचा तुकडा दाबल्याने हा त्रास कमी होवू शकतो.
लवंग त्वचेतील समस्या, जसे की पिंपल्स आणि पुरळ, कमी करण्यास मदत करते.
लवंग अति प्रमाणात खाल्ल्यास काही दुष्परिणाम होऊ शकतात, जसे की डोकेदुखी, चक्कर येणे आणि अशक्तपणा. त्यामुळे, ते योग्य प्रमाणातच वापरावे.