सकाळ डिजिटल टीम
आपल्या शरीराला अनेक पोषक घटकांची गरज भासत आसते.
शरीर तंदूरूस्त राहावे, तसेच शरीरात पोषक घटकांची कमतरता भासू नये यासाठी आनेक लोक मांसाहार करतात.
जे लोक शाकाहार करतात त्यांना बहूतेक वेळा प्रश्र्न पडतो की शरीरात पोषक घटकांची कमतरता भासू नये यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन करावे.
शाकाहारी लोकांसाठी सर्वोत्तम प्रोटीन डाळ कोणती आहे जाणून घ्या.
मसूर डाळ ही शाकाहारी व्यक्तींसाठी प्रोटीन डाळ ठरु शकते.
मसूर डाळ ही पौष्टीकतेचे एक शक्तिशाली केंद्र मानले जाते.
१०० ग्रॅम शिजवलेल्या डाळीमध्ये सुमारे ९ ग्रॅम प्रथिने असतात.
मसूर डाळीत चरबीचे प्रमाण कमी असल्याने ते हृदयासाठी देखील फायदेशीर माणले जाते.
मांसाहारी पदार्थांमध्ये कोलेस्टोल आणि संतृप्त चरबीचे प्रमाण जास्त असते, तर मसूरमध्ये फायबर, लोह आणि फोलेट हे घटक भरपूर प्रमाणात अढळतात.