पुजा बोनकिले
दुधी भोपळा ज्यालाच लौकी देखील म्हणतात.
ही एक आरोग्यदायी आणि पौष्टिक भाजी आहे.
दुधी भोपळा खाण्याचे जबरदस्त फायदे आहेत.
पोषक तत्वांनी समृद्ध दुधीमध्ये व्हिटॅमिन सी,जीवनसत्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात.
दुधी भोपळ्यात असलेले फायबर पचन सुलभ ठेवते.
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी दुधी भोपळा फायदेशीर ठरतो.
दुधी भोपळ्यामध्ये ९० टक्के पाणी असते. यामुळे वजन नियंत्रणात राहते.
यात असलेले अँटिऑक्सिडंट, जीवनसत्वे त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर असते.