Aarti Badade
रोगप्रतिकारशक्तीपासून हृदयाच्या आरोग्यापर्यंत जाणून घ्या किवीचे फायदे.
kiwi
Sakal
किवीमध्ये व्हिटॅमिन C भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि संसर्गाचा धोका कमी होण्यास मदत मिळते.
kiwi
Sakal
किवीतील फायबर पचनसंस्था निरोगी ठेवते. तसेच बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करून पोट साफ राहण्यास मदत करते.
kiwi
Sakal
डेंग्यूच्या काळात कमी झालेल्या प्लेटलेट्सच्या पुनर्बांधणीसाठी किवी उपयुक्त मानले जाते. मात्र, याला वैद्यकीय उपचारांचा पर्याय समजू नये.
kiwi
Sakal
किवीतील पोटॅशियम आणि अँटिऑक्सिडंट्स रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. तसेच त्वचा तजेलदार राहण्यास आणि डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासही सहाय्य करतात.
kiwi
Sakal
किवीमध्ये व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन E, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. हे पोषक घटक शरीराला ऊर्जा देतात आणि एकूण आरोग्य सुधारण्यास मदत करतात.
kiwi
Sakal
किवीचे अतिसेवन केल्यास काहींना तोंड किंवा घशात खाज, ॲलर्जी यांसारख्या समस्या होऊ शकतात. रक्त पातळ करणारी औषधे घेत असल्यास किवीचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
kiwi
Sakal
triphala
Sakal