रोज सकाळी त्रिफळा घेताय? मग शरीरात होतात 'हे' बदल!

Aarti Badade

पचनक्रिया सुधारते

त्रिफळाचे नियमित सेवन केल्याने पचनसंस्था निरोगी राहते. तसेच बद्धकोष्ठतेची समस्या कमी होऊन शौचास सहजता येते.

triphala

|

Sakal

गॅस आणि अपचनापासून आराम

त्रिफळा गॅस, अपचन आणि पोट फुगण्यासारख्या समस्या कमी करण्यास मदत करते. त्यामुळे पोट हलके आणि आरामदायी वाटते.

triphala

|

Sakal

आतडी स्वच्छ राहतात

त्रिफळा आतड्यांची नैसर्गिक स्वच्छता राखण्यास मदत करतो. त्यामुळे शरीरातील अनावश्यक घाण बाहेर पडण्यास सहाय्य होते.

triphala

|

Sakal

रोगप्रतिकारशक्ती वाढते

आवळ्यासह त्रिफळातील अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन C शरीराची रोगप्रतिकारक क्षमता मजबूत करण्यास मदत करतात.

triphala

|

Sakal

दोषांचे संतुलन राखते

आयुर्वेदानुसार त्रिफळा वात, पित्त आणि कफ या तिन्ही दोषांचे संतुलन राखण्यास उपयुक्त मानली जाते.

triphala

|

Sakal

त्वचेसाठी फायदेशीर

त्रिफळामुळे रक्तशुद्धी होण्यास मदत मिळते. त्यामुळे पिंपल्स कमी होऊन त्वचेवर नैसर्गिक तेज आणि ताजेपणा दिसू शकतो.

triphala

|

Sakal

सेवन करताना घ्या ही काळजी

त्रिफळाचे अतिसेवन किंवा सलग अनेक महिने सेवन केल्यास शरीरात कोरडेपणा, जुलाब, पोटदुखी किंवा मळमळ यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

triphala

|

Sakal

वातावरणातील बदलामुळे झोपेवर परिणाम का होतो?

sleep 

|

Sakal

येथे क्लिक करा