Anushka Tapshalkar
अंजीर हे पोषणमूल्यांनी समृद्ध फळ असून, त्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.
रात्रभर भिजवलेले अंजीर सकाळी उठून खाल्ल्यास अधिक फायदे मिळतात, विशेषतः जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल.
चला जाणून घेऊया की, भिजवलेले अंजीर आपल्या सकाळच्या आहारात का समाविष्ट करावे –
अंजीरमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते, जे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास दूर करते.
भिजवलेले अंजीर खाल्य्याने पोट जास्त काळ भरलेले राहते, त्यामुळे अनावश्यक भूक लागणे कमी होते आणि वजन नियंत्रणात राहते.
अंजीरचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, त्यामुळे ती रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
अंजीरमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि पोटॅशियम असते, जे हृदयाचे आरोग्य सुधारते आणि रक्तदाब नियंत्रित ठेवते.
भिजवलेल्या अंजीरांमध्ये असलेले व्हिटॅमिन C आणि इतर पोषक घटक शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवतात आणि संसर्गांपासून संरक्षण करतात.
अंजीर हे कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे उत्तम स्रोत आहे, जे हाडे मजबूत करण्यास मदत करतात आणि ऑस्टिओपोरोसिस टाळतात.
अंजीर पुरुष आणि महिलांसाठी फायदेशीर आहे, कारण ती प्रजनन क्षमता सुधारते आणि हार्मोन्स संतुलित ठेवण्यास मदत करते.
अंजीरमध्ये असलेले मॅग्नेशियम नैसर्गिक स्ट्रेस रिलिव्हर म्हणून कार्य करते आणि मज्जासंस्थेला शांत ठेवते.
भिजवलेले अंजीर लोहाचा उत्तम स्रोत आहेत, जे शरीरात लोहाची कमतरता (अॅनिमिया) दूर करण्यास मदत करतात.
अंजीर शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते आणि यकृताच्या कार्यक्षमतेस मदत करते.