Anushka Tapshalkar
आपण स्वयंपाक करताना अनेक साली, देठ, बिया यांना ‘कचरा’ समजून फेकून देतो. पण खरंतर हेच अन्नघटक पोषणमूल्यांनी भरलेले असतात!
अनेक घरांमध्ये या गोष्टींना उपयोग न करता टाकून दिलं जातं, पण त्यात लपलेले असतात फायबर, अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वांचे भांडार!
कधी कधी त्यांचा खरा पोषणमूल्यांचा स्रोत असतो साली, देठ किंवा बियामध्ये. जाणून घ्या हे अन्नकण का आहेत खास!
बटाट्याच्या सालीमध्ये आतील गरापेक्षा तीनपट अधिक लोह असतं. पोटॅशियममुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि अँटीऑक्सिडंट्स पेशींचं रक्षण करतात.
देठामध्ये फायबर, क्लोरोफिल, अॅन्टी-इंफ्लेमेटरी घटक आणि अॅन्टीऑक्सिडंट्स असतात. ते पचन सुधारतात आणि सूज कमी करतात. वरून ते पानांपेक्षा जास्त सुगंधी असतात.
लालसर सालीत शेंगदाण्यापेक्षा तीनपट अँटीऑक्सिडंट्स असतात. त्या हृदयाचं आरोग्य सुधारतात, त्वचेला उजाळा देतात आणि पेशींचं वृद्धत्व कमी करतात.
ही पाने व्हिटॅमिन A, C आणि कॅल्शियमने परिपूर्ण असतात. त्यांचा आहारात वापर केल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि डोळ्यांचं आरोग्य सुधारतं.
या बियांमध्ये झिंक, प्रोटीन आणि चांगले फॅट्स असतात. हृदयाचं आरोग्य जपतात, केस आणि त्वचेला पोषण देतात. बिया भाजून खाल्ल्यास उत्तम स्नॅकही होतो!