Aarti Badade
आल्याला आयुर्वेदात "महौषध" म्हटले जाते. शरीर शुद्ध करणारे आणि आमदोष घालवणारे गुण यात आहेत.
आले कफ कमी करते, पचन सुधारते व लाळग्रंथीमधून पाचक रस निर्माण होण्यास मदत करते.
आले शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते, अग्नीला मदत करते आणि श्वसनसंस्थेला लाभ देते.
आले अँटिऑक्सिडंट व अँटिइन्फ्लमेटरी आहे. जीर्ण व्याधींमध्येही याचा चांगला उपयोग होतो.
अँटिमायक्रोबियल गुणधर्मांमुळे आले सर्दी, खोकला, घशातील खवखव व श्वसनाच्या त्रासात उपयोगी पडते.
चहामध्ये आले घालणे किंवा आले-लिंबू-गरम पाण्याचे पेय घेणे आरोग्यासाठी लाभदायक ठरते.
फोडणीत आले किसून घालणे, भाज्यांच्या ग्रेव्हीत भाजलेले आले वापरणे – अन्नाला चव व आरोग्य देते.
वाताच्या त्रासासाठी सुंठ-गूळ-तुपाचे गोळे उपयुक्त ठरतात.
आले-लिंबाच्या रसात मध वा काळे मीठ मिसळून घेतल्यास भूक वाढते, गॅसेस कमी होतात, मळमळ थांबते.
आले, साखर व पाणी उकळून सिरप तयार करून त्यात लिंबू, सोडा, बर्फ घालून गार पेय बनवता येते.