सकाळ डिजिटल टीम
एरंडेल तेलामुळे केसांना पोषण मिळते, त्यांची वाढ सुधारते आणि आरोग्य देखील निरोगी राहते.
एरंडेल तेल ३० ते ४० मिनिटांसाठी मसाज करा किंवा रात्रभर लावून ठेवा, यामुळे कोंडा, खाज आणि इतर समस्या दूर होतात.
एरंडेल तेलात असलेले रिकिनोलेइक अॅसिड रक्ताभिसरण सुधारते आणि केस गळती कमी करण्यास मदत करते.
एरंडेल तेल आणि आल्याचा रस मिसळून टाळू आणि केसांवर २० ते ३० मिनिटांसाठी लावा. हा उपाय आठवड्यातून दोन ते तीन वेळा करा.
एरंडेल तेल, कोरफड जेल आणि टी ट्री ऑइलचे मिश्रण केसांवर ३० ते ४० मिनिटांसाठी लावा, यामुळे कोंडा आणि खाज कमी होईल.
कोरफड जेलमध्ये केसांसाठी पोषक असलेले घटक असतात. यामुळे केसांना ओलावा मिळतो आणि कोंडा कमी होतो.
एरंडेल तेल, बदामाचे तेल आणि मेहंदीच्या तेलाचे मिश्रण ३० ते ४० मिनिटांसाठी केसांवर लावा. यामुळे केसांची चांगली वाढ होईल.