Anushka Tapshalkar
पावसाळ्यात सूर्य लपलेला असला तरी UVA आणि UVB किरणं त्वचेला इजा पोहोचवू शकतात. त्यामुळे त्वचा टॅन होणे, डाग, वयापेक्षा लवकर वृद्ध दिसणं यासारख्या समस्या वाढू शकतात. त्यामुळे रोज सनस्क्रीन लावणं महत्त्वाचं आहे.
तेलकट त्वचेसाठी जेल किंवा मॅट बेस, कोरडी व संवेदनशील त्वचेसाठी क्रीम किंवा लोशन बेस निवडा.
एसपीएफ (UVB पासून) आणि पीए (UVA पासून) दोन्हींचं संरक्षण असलेला सनस्क्रीन वापरणं आवश्यक.
SPF 15 ते 100 पर्यंतचे सनस्क्रीन सुमारे 93% ते 99% पर्यंत सूर्यकिरणांपासून संरक्षण देतात. PA++/+++ जितकी जास्त, तितकं UVA पासून अधिक संरक्षण.
हा UVA आणि UVB दोन्ही प्रकारांपासून त्वचेला संरक्षण देतो.
जेल, क्रीम, स्टिक, पावडर, स्प्रे – तुम्हाला सोयीचा आणि त्वचेला अनुकूल असा फॉर्म निवडा.
पावसाळ्यातसुद्धा नियमितपणे सनस्क्रीन वापरल्यास त्वचेचं आरोग्य टिकवून ठेवता येतं.