Sandeep Shirguppe
करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या पालखीला सलामी देण्यासाठी तोफ उडवण्याची परंपरा १७१५ पासून जपली जात आहे.
Mahalaxmi Temple Kolhapur
esakal
दर शुक्रवारी रात्री दहा वाजता देवीच्या पालखीला सलामी देण्यासाठी तोफ उडवली जाते. नवरात्रोत्सवातही या परंपरेला विशेष महत्त्व आहे.
Mahalaxmi Temple Kolhapur
esakal
जिजाऊंचे वडील लखुजीराव जाधव यांच्या घराण्याचा हा ऐतिहासिक वारसा अकराव्या पिढीपर्यंत जपला जात आहे.
Mahalaxmi Temple Kolhapur
esakal
अंबाबाईच्या पालखीला सलामी देण्यासाठी वर्षभरात तब्बल ६७ वेळा तोफ उडवली जाते. या तोफेला ‘लक्ष्मीची तोफ’ असे म्हटले जाते.
Mahalaxmi Temple Kolhapur
esakal
पंचधातूपासून बनवलेली ही तोफ साडेतीन फूट लांब असून तिचे वजन सुमारे १०० किलो आहे. तोफेवर ‘शंभूराजे’ हे नाव कोरलेले आहे.
Mahalaxmi Temple Kolhapur
esakal
मंदिरातील बंदिस्त ओवरीत असलेल्या तोफखाना कक्षात ही ऐतिहासिक तोफ ठेवली जाते. तिचा वापर परंपरेनुसार केला जातो.
Mahalaxmi Temple Kolhapur
esakal
बाबाजी कृष्णाजी जाधव, बाळासाहेब महादेव जाधव यांच्यानंतर सध्या धनाजी जाधव यांच्याकडे तोफेची सलामी देण्याचा मान आहे.
Mahalaxmi Temple Kolhapur
esakal
तोफ उडवण्याच्या प्रक्रियेत पारंपरिक पद्धतीने कापडी गोळ्यांचा वापर केला जातो. तोफेसाठी लागणारी दारू विकत घेण्याचा परवानाही जाधव घराण्याकडे आहे.
Mahalaxmi Temple Kolhapur
esakal