लोणावळ्याच्या 'त्या' भयंकर बंगल्याचं खरं रहस्य काय?

संतोष कानडे

निसर्गसौंदर्य

निसर्गसौंदर्यामुळे लोणावळ्याकडे पर्यटकांचा ओढा असतो. अनेकजण इथे घर खरेदी करतात.

आयेशा व्हिला

लोणावळ्याजवळील आयेशा व्हिला हा जुना बंगला त्याच्या गूढ कथांमुळे चर्चेत असतो.

कुटुंबाची कहाणी

या बंगल्याबाबत आयेशा नावाच्या तरुणीची आणि तिच्या कुटुंबाची कहाणी सांगितली जाते.

कुटुंबावर हल्ला

काही कथांनुसार, या बंगल्यात कुटुंबावर हल्ला झाल्याचा दावा केला जातो.

पुरावे

मात्र, या कथांना पुष्टी देणारे ठोस ऐतिहासिक किंवा पोलिसी पुरावे उपलब्ध असल्याचे स्पष्ट झालेले नाही.

रोल्स रॉइस

या बंगल्यात उभी असलेली सोनेरी रंगाची जुनी रोल्स रॉइस कार हे त्याचे प्रमुख आकर्षण आहे.

सिल्व्हर शॅडो

ही कार रोल्स रॉइस सिल्व्हर शॅडो या प्रकारातील असल्याचे सांगितले जाते.

उत्पादन

या गाडीचे उत्पादन १९६५ ते १९८० या काळात झाले होते.

लकीर

ही कार २००४ मधील ‘लकीर’ या हिंदी चित्रपटात वापरल्याचे वृत्त आहे.

पारशी कुटुंब

हा बंगला एका श्रीमंत पारशी कुटुंबाच्या मालकीचा होता, अशीही एक प्रचलित कथा आहे.

बंगला

कुटुंबातील पुढील पिढी परदेशात स्थायिक झाल्यामुळे बंगला दुर्लक्षित राहिला, असे सांगितले जाते.

पुरावा

बंगल्यात भुतांचा वावर असल्याच्या अनेक चर्चा आहेत; मात्र त्याला सिद्ध करणारा विश्वसनीय पुरावा नाही.

झोपेत असताना पडल्यासारखं का वाटतं?

Hypnic Jerk Explained

|

esakal

<strong>येथे क्लिक करा</strong>