विदर्भात आहे वन्यजीवांचं अनोख गाव...प्राणीच करतात राज्य

Shubham Banubakode

निसर्गाचा सुंदर खजिना

विदर्भ म्हटलं की मेळघाट आठवतं; पण बुलढाणा जिल्ह्यातील अंबाबरवा अभयारण्यही निसर्गप्रेमींसाठी एक सुंदर आणि शांत ठिकाण आहे.

Ambabarwa Wildlife Sanctuary

|

esakal

कुठे आहे हे अभयारण्य?

बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात अंबाबरवा अभयारण्य पसरलेलं आहे. मेळघाटच्या परिसराला लागून असलेलं हे ठिकाण अजूनही फारसं प्रसिद्ध नाही.

Ambabarwa Wildlife Sanctuary

|

esakal

डोंगर-दऱ्यांचं सौंदर्य

अभयारण्यात फिरताना विस्तीर्ण डोंगर, खोल दऱ्या आणि हिरवागार परिसर पाहायला मिळतो. इथलं निसर्गसौंदर्य मनाला प्रसन्न करतं.

Ambabarwa Wildlife Sanctuary

|

esakal

वन्यजीवांचा अनोखा संसार

अंबाबरवा अभयारण्यात बिबट्या, अस्वल, सांबर, चितळ आणि रानडुकरांसारखे वन्यजीव आढळतात. त्यामुळे जंगलभ्रमंतीचा अनुभव अधिकच खास बनतो.

Ambabarwa Wildlife Sanctuary

|

esakal

पक्ष्यांचा किलबिलाट

रंगीबेरंगी पक्ष्यांच्या आवाजाने इथलं जंगल कायम गजबजलेलं असतं. पक्ष्यांचं निरीक्षण करण्याची आवड असणाऱ्यांसाठी हे ठिकाण एक पर्वणीच आहे.

Ambabarwa Wildlife Sanctuary

|

esakal

पाणवठ्यांवर वन्यजीव दर्शन

उन्हाळ्यात पाणवठ्यांवर पाणी पिण्यासाठी येणारे वन्यजीव पाहण्याची संधी मिळू शकते. मात्र, वन्यजीव दिसतीलच याची खात्री नाही.

Ambabarwa Wildlife Sanctuary

|

esakal

गर्दीपासून दूर शांतता

अजूनही पर्यटकांच्या फारशा गर्दीपासून दूर असलेल्या या अभयारण्यात जंगलाचा शांत अनुभव घेता येतो. शहराच्या धावपळीपासून ब्रेक मिळतो.

Ambabarwa Wildlife Sanctuary

|

esakal

भेट द्यायलाच हवी

निसर्ग, डोंगर आणि वन्यजीवांची आवड असेल, तर अंबाबरवा अभयारण्याला भेट द्या. इथला शांत परिसर तुमची सहल नक्कीच संस्मरणीय करेल.

Ambabarwa Wildlife Sanctuary

|

esakal

कोल्हा द्राक्ष खात नाही, मग 'कोल्ह्याला द्राक्ष आंबट' असं का म्हटलं जातं?

Does Fox Really Eat Grapes

|

esakal

हेही वाचा -