कोल्हा द्राक्ष खात नाही, मग 'कोल्ह्याला द्राक्ष आंबट' असं का म्हटलं जातं?

Shubham Banubakode

गोष्ट

लहानपणी आपण कोल्हा आणि द्राक्षांची गोष्ट ऐकली असेल. उंच वेलीवरची द्राक्षं मिळत नसल्याने कोल्हा त्यांना आंबट म्हणतो.

Does Fox Really Eat Grapes

|

esakal

द्राक्षं का सोडली?

कथेप्रमाणे, कोल्ह्याने द्राक्षं मिळवण्यासाठी अनेकदा उड्या मारल्या. मात्र, ती हाताशी न आल्याने त्याने प्रयत्न सोडून दिले.

Does Fox Really Eat Grapes

|

esakal

द्राक्षं खरंच आंबट?

नाही! गोष्टीत द्राक्षं आंबट असल्याचा उल्लेख हा कोल्ह्याचा स्वतःला समजावण्याचा भाग आहे. प्रत्यक्ष द्राक्षांची चव तपासलेली नसते.

Does Fox Really Eat Grapes

|

esakal

कोल्हा काय खातो?

कोल्हा सर्वभक्षी प्राणी आहे. तो उंदीर, पक्षी, कीटक यांच्यासोबतच बेरी, सफरचंद, चेरी आणि नाशपती यांसारखी फळंही खातो.

Does Fox Really Eat Grapes

|

esakal

कोल्हे द्राक्षं खातात का?

कोल्ह्यांच्या आहारात काही फळांचा समावेश असतो. मात्र, तो द्राक्षं किंवा मनुका खात नाही.

Does Fox Really Eat Grapes

|

esakal

धोकादायक?

RSPCA ने दिलेल्या माहितीनुसार, द्राक्षं आणि मनुका कोल्ह्यांसाठी विषारी ठरू शकतात.

Does Fox Really Eat Grapes

|

esakal

म्हणीचा अर्थ?

एखादी गोष्ट मिळवता आली नाही, तर तिच्यातच दोष काढून स्वतःचं समाधान करून घेणं, याला द्राक्षं आंबट म्हणतात.

Does Fox Really Eat Grapes

|

esakal

प्रयत्न

आपल्याला एखादी गोष्ट मिळाली नाही, तर तिची किंमत कमी करण्यापेक्षा आपली मर्यादा स्वीकारून पुन्हा प्रयत्न करणं महत्त्वाचं असतं.

Does Fox Really Eat Grapes

|

esakal

निवडणूक जिंकणाऱ्याचा होतो मृत्यू; या गावात कोणीच निवडणूक लढवत नाही

Khunkhuna

|

esakal

हेही वाचा -