केवळ किल्ला नाही, तर स्वातंत्र्यलढ्याची स्मृती आहे अंबागड! कसं पोहचायचं

Aarti Badade

अंबागड – इतिहास आणि निसर्गाचा संगम

अंबागड किल्ला केवळ लष्करी केंद्र नव्हता, तर स्वातंत्र्य संग्रामाचा जिवंत साक्षीदार होता. आजही त्याचा रुबाब टिकून आहे.

Ambagad Fort | Sakal

स्वातंत्र्य लढ्यातील सहभाग

१८१८ मधील लांजी उठावानंतर स्थानिक स्वातंत्र्यसैनिकांनी या किल्ल्यावरून ब्रिटिशांविरुद्ध संघर्ष छेडला होता.

Ambagad Fort | Sakal

अवशेषात दडलेला इतिहास

किल्ल्याच्या तटबंदी, तुरुंग आणि भग्न वास्तू आजही त्या संघर्षाच्या कथा सांगतात. इथे उभं राहिलं की भूतकाळ जिवंत होतो.

Ambagad Fort | Sakal

ट्रेकिंगचा थरारक अनुभव

दाट जंगल, अरुंद वाटा आणि निसर्गाच्या कुशीतून जाणारी वाट – अंबागड ट्रेक हा एक साहसप्रद प्रवास आहे.

Ambagad Fort | Sakal

शिखरावरून नजराणा

किल्ल्याच्या माथ्यावरून दिसणारे हिरवे डोंगर, दऱ्या आणि खुलं आकाश – प्रत्येक क्षण कॅमेरात टिपावा असा!

Ambagad Fort | Sakal

कसे पोहोचाल अंबागडवर?

चिचोली रेल्वे स्थानकापासून केवळ ४.५ किमी अंतरावर. नागपूर विमानतळापासून १०० किमीवर. रस्ता आणि बसची चांगली सोय.

Ambagad Fort | Sakal

भेटीचा सर्वोत्तम काळ

पावसाळा आणि हिवाळा – जुलै ते फेब्रुवारीमध्ये हिरवाई, आल्हाददायक हवामान आणि ट्रेकिंगसाठी उत्तम वेळ!

Ambagad Fort | Sakal

जवळची इतर ठिकाणं

अंधाळगाव – वस्त्रनिर्मितीसाठी प्रसिद्ध. नागझिरा – जंगलसफारी आणि छायाचित्रणासाठी उत्तम. तुमसर – सांस्कृतिक ठिकाण.

Ambagad Fort | Sakal

कोरांबी देवी मंदिर

निसर्गरम्य डोंगरात वसलेलं हे मंदिर शांततेसाठी आणि अध्यात्मासाठी आदर्श ठिकाण.

Ambagad Fort | Sakal

का जावं अंबागडला?

इतिहास, निसर्ग, साहस, आणि शांतता – या सर्वाचा एकत्र अनुभव घ्यायचा असेल, तर एकदातरी अंबागड किल्ला पाहायलाच हवा!

Ambagad Fort | Sakal

12 वर्षांनी सूर्य-गुरू युतीचा दुर्लभ योग, या राशींचं नशीब उजळणार!

Lucky Zodiacs | Sakal
येथे क्लिक करा