Pranali Kodre
सिंधूदुर्ग जिल्ह्यातील आंबोली हे समुद्रसपाटीपासून ६९० मीटर उंचीवर असलेलं खंड हवेचं ठिकाण असून बराचसा दाट भाग जंगलाने व्यापलेला आहे.
Amboli, Sindhudurg
X/maha_tourism
आंबोली हा ब्रिटिशकाळात बेळगाव ते वेंगुर्ला असा समुद्राला जोडणाऱ्या रस्त्याचा भाग असल्याने त्याला काळात ब्रिटिशांच्या विश्रांतीसाठी या भागाचा विकास करण्यात आला होता.
Amboli, Sindhudurg
X/maha_tourism
सावंतवाडी संस्थानाची उन्हाळ्यातील राजधानी म्हणूनही आंबोलीची ओळख राहिली आहे. राजवाड्याच्या खुणा असूनही येथे पाहायला मिळतात.
Amboli, Sindhudurg
X/maha_tourism
मुसळधार पाऊस आणि धबधब्यांचा मनमुराद आनंद घेण्यासाठी आंबोली हे उत्तम ठिकाण आहे. वर्षाविहारासाठी आंबोली हे पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे.
Amboli, Sindhudurg
X/maha_tourism
पर्यटनासाठी जुलै ते सप्टेंबर हा कालावधीही चांगला आहे. पावसाळा आणि हिवाळ्यात येथील निसर्गसौदर्य भूरळ घालते.
Amboli, Sindhudurg
X/maha_tourism
दरम्यान, खोल दऱ्या असल्याने आंबोलीमध्ये पावसाळ्यात फिरताना विशेष काळजीही घ्यावी.
Amboli, Sindhudurg
X/maha_tourism
पर्यटकांसाठी या ठिकाणी शासकीय विश्रामगृहे आहेत. याशिवाय विविध रिसॉर्ट आणि हॉटल्सही उपलब्ध आहेत. सावंतवाडी हे आंबोलीसाठी जवळचे रेल्वेस्थानक आणि बसस्थानक आहे.
Amboli, Sindhudurg
X/maha_tourism
आंबोली हे जैवविविधतेचा आभ्यास करणाऱ्यांसाठीही महत्त्वाचे ठिकाण असून येथे साप, बेडूक, फुलपाखरे यांच्या विविध प्रजाती पाहायला मिळतात.
Amboli, Sindhudurg
X/maha_tourism
Explore Kopeshwar Temple, Kolhapur
Sakal