कोल्हापूर जिल्ह्यातील कोपेश्वर मंदिर - शिल्पकलेचा उत्तम नमुना

Pranali Kodre

कोपेश्वर मंदिर

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यामधील खिद्रापूरचे श्री कोपेश्वर मंदिर हे प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर कृष्णाकाठी हे मंदिर उभे आहे.

Explore Kopeshwar Temple, Kolhapur

|

Sakal

११ व्या शतकातील मंदिर

१२६ खांबांवरती उभे असलेले हे मंदिर गजरथावरती स्थिरावण्यात आलेलं आहे. ११ व्या शतकात शिलाहार घराण्याच्या राजवटीच्या काळात हे मंदिर उभारल्याचे समजते.

Explore Kopeshwar Temple, Kolhapur

|

Sakal

मनमोहक कलाकृती

हे मंदिर स्थापत्यकलेचा एक उत्तम नमुना असून स्वर्गमंडप, सभामंडप, अंतराळ आणि गाभारा अशा चार भागात विभागणी केलेली आहे. कलात्मक रचनेमुळे स्वर्गमंडप विशेष भावतो.

Explore Kopeshwar Temple, Kolhapur

|

Sakal

शिल्पकलेचा एक अप्रतिम नमुना

हे मंदिर शिल्पकलेचा एक अप्रतिम नमुना असून मंदिरात इतिहास सांगणारे जुन्या कन्नड व देवनागरी लिपीमधील बरेच शिलालेख पाहायला मिळतात.

Explore Kopeshwar Temple, Kolhapur

|

Sakal

शिव आणि विष्णू लिंगे

कोपेश्वर मंदिर शिवसमर्पित असले, तरी गाभाऱ्यात शिव आणि विष्णू ही दोन लिंगे आहेत. विष्णू धोपेश्वर स्वरुपात पाहायला मिळतात.

Explore Kopeshwar Temple, Kolhapur

|

Sakal

नंदी व नंदीमंडप नाही

साधारणपणे शिवमंदिरात शिवपिंडीपुढे नंदी व नंदीमंडप असतो, मात्र कोपेश्वर मंदिरात नंदी व नंदीमंडप नाही.

Explore Kopeshwar Temple, Kolhapur

|

Sakal

विशेष आकर्षण

महाशिवरात्रीला येथे उत्सव असतो, तसेच मे महिन्यात किरणोत्सव असतो. या ठिकाणी पौष आमावस्येला यात्रा भरते.

Explore Kopeshwar Temple, Kolhapur

|

Sakal

जवळची पर्यटनस्थळं

कोपेश्वर मंदिराला भेट देण्यासोबत जवळपास असणाऱ्या नृसिंहवाडी, मिरज शहर, सांगलीचे गणपती मंदिर अशा पर्यटनस्थळानांही भेट देता येते.

Explore Kopeshwar Temple, Kolhapur

|

Sakal

खाजगी वाहन असेल तर उत्तम...

खिद्रापूरमध्ये पर्यटकांसाठी राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था होऊ शकते. पण येथे येण्यासाठी खाजगी वाहन असेल, तर उत्तम. कारण सार्वजनिक वाहने येथे येण्याची संख्या कमी आहे.

Explore Kopeshwar Temple, Kolhapur

|

Sakal

रुपेरी समुद्रकिनारा अन् मिठागरे असलेलं सिंधुदुर्गमधील शिरोडा गाव

Shiroda, Sindhudurg, Konkan

|

Sakal

येथे क्लिक करा