Yashwant Kshirsagar
भारतात स्वयंपाकघर म्हटले की LPG सिलिंडर आणि गॅस शेगडीचे चित्र सहज डोळ्यांसमोर येते. पण अमेरिकेत हे दृश्य वेगळे असते.
US kitchen Gas System
esakal
अनेक अमेरिकन घरांच्या स्वयंपाकघरात लाल किंवा निळे गॅस सिलिंडर दिसत नाहीत. यामागे त्यांची वेगळी इंधनपुरवठा व्यवस्था आहे.
US kitchen Gas System
esakal
अमेरिकेतील शहरांमध्ये घरांपर्यंत पाईपलाईनद्वारे नैसर्गिक वायू पोहोचवला जातो. पाण्याच्या नळाप्रमाणे गॅसही थेट घरात येतो.
US kitchen Gas System
esakal
ज्या घरात नॅचरल गॅसचे कनेक्शन असते, तेथे किचनमधील गॅस शेगडी थेट पाईपलाईनला जोडलेली असते. त्यामुळे सिलिंडर बदलण्याचा प्रश्नच येत नाही.
US kitchen Gas System
esakal
घरात वापरल्या जाणाऱ्या गॅसचे मोजमाप करण्यासाठी सहसा बाहेर गॅस मीटर बसवलेले असते. वापरानुसार कंपनी मासिक बिल पाठवते.
US kitchen Gas System
esakal
प्रत्येक अमेरिकन घरात गॅस शेगडी असतेच असे नाही. अनेक घरांत इलेक्ट्रिक स्टोव्ह किंवा इंडक्शन कुकटॉपवर स्वयंपाक करतात.
US kitchen Gas System
esakal
स्वयंपाकघरात पोर्टेबल प्रोपेन सिलिंडर ठेवणे अमेरिकेत सामान्य नाही. सुरक्षा नियम आणि घरबांधणीची पद्धत यामुळे इंधन साठवणूक बाहेर केली जाते.
US kitchen Gas System
esakal
ग्रामीण किंवा पाईपलाईन नसलेल्या भागांत प्रोपेनच्या मोठ्या टाक्या वापरल्या जातात. त्या सहसा घराबाहेर बसवून पाईपने घरातील उपकरणांना जोडल्या जातात.
US kitchen Gas System
esakal
बाहेरची प्रोपेन टाकी केवळ शेगडीसाठीच नव्हे, तर वॉटर हीटर आणि घर गरम ठेवण्याच्या यंत्रणेसाठीही वापरली जाऊ शकते.
US kitchen Gas System
esakal
भारतात अनेक कुटुंबे LPG सिलिंडरवर अवलंबून असतात. अमेरिकेत मात्र पाईपलाईन नॅचरल गॅस, वीज, इंडक्शन किंवा बाहेरील प्रोपेन टँक असे विविध पर्याय असल्यामुळे किचनमध्ये सिलिंडर सहसा दिसत नाही.
US kitchen Gas System
esakal
Nepal Saturday Weekly Holiday
esakal