सूरज यादव
राज्यात हिंदीची सक्ती नको, मराठी अस्मिता जपण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आक्रमक झाले आहेत. पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी सरकारला इशारा दिलाय.
हिंदी तृतीय भाषा म्हणून शैक्षणिक अभ्यास क्रमात समाविष्ट करण्यात आलीय. यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आक्रमक झाले आहेत.
मराठी भाषेसाठी लढणाऱ्या राज ठाकरे यांच्या मुलाने मात्र मराठी ऐवजी जर्मन भाषेची निवड केली होती. अमित ठाकरे यांनी ज्युनिअर कॉलेजमध्ये मराठी ऐवजी जर्मन भाषा निवडली होती.
अमित ठाकरे यांनी कॉमर्सचं शिक्षण घेत असताना भाषा विषयासाठी काही पर्याय होते. त्यात मराठी, हिंदी, फ्रेंच, जर्मन आणि गुजराती या भाषा होत्या.
अमित ठाकरे यांच्या जर्मन भाषा निवडीबाबत राज ठाकरेंच्या पत्नी शर्मीला यांनी म्हटलं होतं की, आम्ही घरात मराठी बोलतो आणि दहावीपर्यंत त्यानं मराठी शिकलीय.
चांगले गुण मिळवण्यासाठी म्हणून अमित ठाकरेंनी मराठी ऐवजी जर्मन विषय निवडला असंही शर्मीला ठाकरे यांनी सांगितलं होतं.
अमित ठाकरेंनी मुंबईत आर.ए. पोद्दार कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून शिक्षण पूर्ण केलंय. त्यावेळी ते जर्मन भाषा शिकले.
विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात अमित ठाकरे उतरले होते. माहिम विधानसभा मतदारसंघात २०२४ मध्ये त्यांना पराभवाचा धक्का बसला.