Aarti Badade
पंढरपूरात आषाढी एकादशी दिवशी विठ्ठल-रुक्मिणी महापूजेसाठी निवडले जातात खास ‘मानाचे वारकरी’.
वारी करत दरवर्षी पंढरीकडे प्रपंच सांभाळून पायपीट करणारे असंख्य वारकरी विठ्ठल भेटीसाठी निघतात.
जे दाम्पत्य दर्शन रांगेत सर्वप्रथम असते आणि गळ्यात तुळशीची माळ असते, त्यांची मानाचे वारकरी म्हणून निवड केली जाते.
निवड झालेल्या वारकरी दाम्पत्याला मुख्यमंत्री व त्यांच्या कुटुंबासोबत विठ्ठल महापूजेत सहभागी होण्याचा मान मिळतो.
महापूजेनंतर मुख्यमंत्र्यांकडून सत्कार आणि एक वर्षासाठी मोफत एसटी प्रवास पास दिला जातो.
सध्या 2025 साठी कोण मानाचे वारकरी असतील, हे ठरवले गेलेले नाही. निवड आषाढीच्या आदल्या दिवशी केली जाईल.
रात्री ११ वाजता थांबवलेल्या दर्शन रांगेत पहिलं तुळशीमाळधारी दाम्पत्य ओळखून त्यांना मानाचं पूजेचं आमंत्रण दिलं जातं.