Pranali Kodre
भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची मैत्री विविध क्षेत्रातील लोकांसोबत आहे.
सचिनची बॉलिवूडचा स्टार अभिनेता शाहरुख खान याच्याशीही चांगली मैत्री आहे.
सचिन तेंडुलकरचा आज ५२ वा वाढदिवस असून त्या निमित्ताने या दोघांच्या मैत्रीची साक्ष देणाऱ्या एका खास सोशल मीडियावर पोस्टच्या आठवणींना पुन्हा उजाळा देऊ.
सात वर्षांपूर्वी ३ जुलै २०१८ रोजी सचिन तेंडुलकरने एका लग्नातील शाहरुख सोबतचा टोपी घातलेला फोटो शेअर केला होता.
त्याच्या फोटोच्या कॅप्शनमध्ये सचिनने लिहिले होते की 'Jab SRK met SRT'
त्यावर शाहरुखनेही खास शैलीत उत्तर देताना लिहिले होते की 'आता आपण फोटो अल्बम ठेवत नाही... पण या महान व्यक्तीसोबतचा हा फोटो कायमचा ठेवण्यासाठी मी एक अल्बम बनवेल.'
सचिन आणि शाहरुख यांच्या या फोटोला आणि त्यांच्यातील संवादाला त्यांच्या चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली होती.