kimaya narayan
बॉलिवूडमधील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अनुष्का शर्मा. सध्या ती बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरीही सोशल मीडियावर चर्चेत असते.
अनुष्का आणि विराटची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. पण हे कपल पॉवर कपल म्हणून ओळखलं जातं.
अनुष्काने बॉलिवूडमध्ये उत्तम यश मिळवलं पण आता ती सध्या ब्रेक एन्जॉय करतेय. ती जास्तीत जास्त वेळ लंडनमध्ये घालवत आहे.
अनुष्का वामिका आणि अकाय या दोन मुलांची आई आहे. पण इतकी बिझी असलेली अनुष्का इतकी फिट आणि सडपातळ कशी जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना आहे. एका मुलाखतीत अनुष्काने महत्त्वाच्या टिप्स शेअर केल्या.
अनुष्का विगन डाएट करते. तसेच ती गहू, तांदूळ खात नाही. इतकंच नाही तर दूध, दुधाचे पदार्थ खाणंही टाळते. ती एकच पदार्थ दिवसातून तीनदाही खाते.
अनुष्काने तिच्या महिला चाहत्यांना लवकर जेवण्याची टीप दिली. ती तिच्या मुलीबरोबरच संध्याकाळी पाच वाजता जेवते आणि लवकर झोपते. यामुळे तिची पचनक्रिया सुधारण्यास खूप मदत झाली.
याबरोबरच अनुष्का नियमित व्यायाम करते.