Monika Shinde
आवळा म्हणजे व्हिटॅमिन C चा खजिना. त्वचा, केस, पचन आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हे एक अद्भुत फळ आहे.
आवळा पचनक्रिया सुधारतो, अॅसिडिटी कमी करतो आणि बद्धकोष्ठतेपासून आराम देतो. रोज सकाळी आवळा रस घेतल्यास पोट कायम स्वच्छ राहतो.
आवळ्यात भरपूर अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन C असते. हे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि सर्दी, खोकला, फ्लूपासून संरक्षण देते.
आवळा केसांच्या मुळांना पोषण देतो, केस गळती थांबवतो आणि केसांना नैसर्गिक काळेपण देतो. त्यामुळे तेलात किंवा मास्कमध्ये वापरणे फायदेशीर ठरते.
त्वचेला नितळ, तेजस्वी आणि तरतरीत बनवण्यासाठी आवळा मदत करतो. त्यातील अँटीएजिंग गुणधर्म त्वचेवर सुरकुत्या येऊ देत नाहीत.
आवळा कोलेस्टेरॉल कमी करतो, रक्तदाब नियंत्रणात ठेवतो आणि हृदयाचे आरोग्य सुधारतो. रोज आवळ्याचा रस पिणे हृदयासाठी लाभदायक आहे.
आवळा स्मरणशक्ती वाढवतो, मानसिक ताण कमी करतो आणि मेंदूला ताजेपणा देतो. विद्यार्थ्यांसाठी आणि वयस्कांसाठी तो उपयोगी आहे.
ताज्या आवळ्याचा रस, लोणचं, चटणी, मुरंबा, किंवा सुकवलेला आवळा कोणत्याही स्वरूपात रोजच्या आहारात आवळ्याचा समावेश करा.