Monika Shinde
वीरभद्रासन हा योगातील एक उभा आसन आहे. यात शरीराची स्थिती योद्ध्यासारखी असते, म्हणून याला ‘वॉरियर पोझ’ असेही म्हणतात.
हा आसन रोज केल्याने हात, पाय, खांदे आणि पाठीला ताकद मिळते. स्नायूंमध्ये ताण निर्माण होतो आणि शरीर मजबूत बनते.
वीरभद्रासन केल्याने शरीराचे संतुलन सुधारते. मानसिक स्थिरता निर्माण होते आणि एकाग्रता वाढते.
ही योगमुद्रा रक्ताभिसरण सुधारते आणि हृदयाच्या आरोग्यास चालना देते. हृदय मजबूत होण्यास मदत होते.
सतत बसून काम करणाऱ्यांना पाठदुखीचा त्रास होतो. वीरभद्रासन केल्याने पाठीच्या स्नायूंना बळ मिळते व दुखणे कमी होते.
हा आसन केल्याने तणाव कमी होतो, आत्मविश्वास वाढतो आणि मानसिक शांतता अनुभवायला मिळते.
दररोज सराव केल्यास सांधे व स्नायू अधिक लवचिक होतात. हालचाली सहज आणि आरामदायक होतात.
वीरभद्रासन दररोज केल्याने संपूर्ण शरीर आणि मन यावर सकारात्मक परिणाम होतो. सातत्य ठेवा आणि निरोगी आयुष्य जगा.