Aarti Badade
आवळा व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्सआणि फायबरने भरलेला असतो. पण काहींसाठी तो नुकसानकारक ठरू शकतो!
आवळा रक्तातील साखर कमी करतो. ज्यांना आधीच लो शुगरची समस्या आहे, त्यांनी तो टाळावा.
आवळ्याचे आंबटपण आम्लपित्त वाढवते. रिकाम्या पोटी खाल्ल्यास पचनाच्या समस्या वाढू शकतात.
आवळ्यातील व्हिटॅमिन सी शरीरात ऑक्सलेट बनवते. हे किडनी स्टोन वाढवू शकते.
आवळा रक्त पातळ करतो. औषधांसोबत घेतल्यास रक्तस्त्रावाचा धोका वाढतो.
आवळ्यामुळे काहींना खाज, पुरळ, लालसरपणा किंवा पचन समस्या उद्भवू शकतात.
आवळा आरोग्यासाठी चांगला असला तरी सर्वांसाठी योग्य नाही. तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच सेवन करा.