Yashwant Kshirsagar
आयुर्वेदात आवळा हे एक सुपरफूड मानले जाते. त्याचे नियमित सेवन कमकुवत प्रतिकारशक्तीपासून ते लठ्ठपणापर्यंतच्या समस्या दूर करते.
व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध आवळ्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.
पण असे असूनही काही वैद्यकीय परिस्थितींमध्ये आवळा खाल्ल्याने आरोग्याला फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ लागते.
चला तर जाणून घेऊया की कोणत्या लोकांनी आवळा खाणे टाळावे.
ज्यांची साखरेची पातळी आधीच कमी आहे त्यांनी आवळा खाणे टाळावे. आवळ्याचे नियमित सेवन केल्याने त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी आणखी कमी होऊन आरोग्यासाठी समस्या निर्माण होऊ शकतात.
रिकाम्या पोटी व्हिटॅमिन सी समृद्ध आवळा खाल्ल्याने आम्लपित्तची समस्या वाढू शकते. ज्यांना आम्लपित्त आहे त्यांनी आवळा खाणे टाळावे.
ज्या लोकांना आधीच रक्तस्त्रावाचा त्रास आहे किंवा रक्त पातळ करणारी औषधे घेत आहेत त्यांनी आवळा खाऊ नये.
जर तुम्ही तुम्ही कोणती शरीरातील कोणती शस्त्रक्रिया करणार असाल तर नुकतीच शस्त्रक्रिया झाली असेल तर आवळा खाणे कमी करा किंवा थांबवा.