Yashwant Kshirsagar
सीताफळात व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे फळ ऊर्जा वाढवते आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते.
सीताफळ जास्त प्रमाणात खाल्ल्यास अपचन, पोट फुगणे किंवा जुलाब होऊ शकतात. यामुळे पचनसंस्थेवर ताण येऊ शकतो.
काही लोकांना सीताफळ खाल्ल्याने अॅलर्जी होऊ शकते. यामुळे त्वचेवर पुरळ किंवा खाज येण्याची शक्यता असते
सीताफळातील काळ्या बिया विषारी असतात. चुकून त्या खाल्ल्यास शरीराला हानी पोहोचू शकते. त्यामुळे बिया काढूनच फळ खावे.
सीताफळात लोह भरपूर असते, पण जास्त लोहामुळे काही लोकांना बद्धकोष्ठता होऊ शकते. पचनाच्या समस्या असणाऱ्यांनी याचे सेवन कमी करावे.
जास्त सीताफळ खाल्ल्याने न्यूरोलॉजिकल आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. यामुळे डोकेदुखी, चक्कर, स्मरणशक्तीच्या समस्या किंवा मूड बदलणे अशा तक्रारी उद्भवू शकतात.
सीताफळ गोड असते, त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. मधुमेही रुग्णांनी सीताफळ खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
सीताफळात कॅलरी जास्त असतात. त्यामुळे जास्त खाल्ल्यास वजन वाढण्याची शक्यता असते. वजन कमी करणाऱ्यांनी याचे सेवन टाळावे.
पचनाच्या समस्या असणारे, मधुमेही रुग्ण आणि वजन नियंत्रणात ठेवणारे लोक यांनी सीताफळ कमी प्रमाणात खावे किंवा टाळावे.
सीताफळ खाताना नेहमी बिया काढाव्यात आणि मर्यादित प्रमाणातच खावे. जास्त खाल्ल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात.