Anushka Tapshalkar
केसांच्या निरोगी वाढीसाठी नैसर्गिक घटक हा उत्तम पर्याय मानला जातो. त्यात आवळ्याला आणि कोरफडीला प्राधान्य आहे, कारण हे दोन्ही घटक केसांना भरपूर पोषण देतात आणि त्यांची वाढ नैसर्गिकरित्या सुधारतात.
आयुर्वेदात आवळा आणि कोरफड हे केसांसाठी उपयुक्त मानले जातात. ते केस मजबूत करून गळती कमी करतात, पण यापैकी काय अधिक प्रभावी आहे? चला जाणून घेऊया.
कोरफडीच्या गरात ९५% पाणी असते, जे केसांना हायड्रेशन देऊन त्यांना मऊ, चमकदार आणि तजेलदार बनवते. नियमित वापराने केसांचा पोत सुधारतो आणि गळती कमी होते.
कमकुवत केसांच्या कुपींमुळे केस तुटण्याची समस्या वाढते. आवळा आवश्यक पोषण देऊन केस मजबूत करतो, तुटणे रोखतो आणि केसांना फाटे फुटणे कमी होते.
आवळ्यातील व्हिटॅमिन C आणि इतर पोषणघटक केसांच्या मुळांना पोषण देऊन त्यांची वाढ वेगवान व मजबूत करतात.
केस अधिक मजबूत आणि दाट दिसण्यासाठी आवळा उत्तम पर्याय आहे. यातील नैसर्गिक घटक केसांना खोलवर पोषण देऊन त्यांना दाट, निरोगी आणि तजेलदार बनवतात.
आवळा स्काल्पला हानिकारक घटकांपासून संरक्षण देतो. यातील अँटीऑक्सिडंट्स मुक्त रॅडिकल्स दूर करून केसांच्या नैसर्गिक वाढीस मदत करतात.
सतत स्टाईलिंग, केमिकल्स आणि प्रदूषणामुळे केस कोरडे होतात. कोरफडीतील जेलयुक्त गुणधर्म केसांना खोलवर ओलावा देतात आणि ड्रायनेस दूर करतात.
जर तुम्हाला लांब आणि मजबूत केस हवे असतील तर आवळा उत्तम पर्याय ठरतो. पण जर कोरडेपणा कमी करून केसांना हायड्रेशन द्यायचं असेल, तर कोरफड अधिक प्रभावी ठरेल.