Anushka Tapshalkar
निरोगी आरोग्यासाठी आहारात सुकामेवा असणे गरजेचे आहे. त्यातही आक्रोड त्यामुळे शरीराला आवश्यक पोषणतत्त्वांनी भरपूर असतात. ते इम्युनिटी वाढते, मेंदू, त्वचा, आणि हृदयाचं आरोग्यही सुधारते.
अक्रोडमधील ओमेगा 3 फॅटी अॅसिड हृदयाच्या आरोग्याला पोषक ठरतं आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित करतं.
अक्रोडमध्ये असलेले मॅग्नेशिअम व फॉस्फरस हाडांची मजबुती वाढवतात.
अक्रोडमधील फायबरमुळे पोट भरल्यासारखं वाटतं, ज्यामुळे अति खाणं टाळता येतं. परिणामी वजन कमी व्हायला मदत होते.
अँटी-ऑक्सिडंट्समुळे शरीराचे संरक्षण मजबूत होते आणि आजारपणापासून बचाव होतो.
फायबरयुक्त अक्रोड पचन क्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करतात.
अक्रोड त्वचेला पोषण देतात व निखार बनवतात. त्यामुळे त्वचा निरोगी राहते.
ओमेगा 3 आणि प्रोटीनमुळे मेंदूची कार्यक्षमता वाढते व लक्ष केंद्रित करणे सोपे होते.
दररोज अक्रोड खाल्ल्याने शरीराला आवश्यक ऊर्जा मिळते आणि थकवा दूर होतो.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्य विषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.