Shubham Banubakode
अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यातील शिरजगाव बंडमध्ये उभा असलेला देशमुख वाडा, विदर्भाच्या जुन्या वास्तुकलेची सुंदर आणि जिवंत ओळख आहे.
Shirajgaon Band Deshmukh Wada
esakal
सुमारे १५० वर्षांपूर्वी बांधलेला हा चौसोपी वाडा आजही आपल्या भक्कम बांधकामामुळे आणि देखण्या रचनेमुळे जुन्या काळाची आठवण करून देतो.
Shirajgaon Band Deshmukh Wada
esakal
माजी राज्यमंत्री वसुधाताई देशमुख यांचे कुटुंब आजही याच वाड्यात वास्तव्यास असून, जुन्या परंपरांचा वारसा जपताना दिसते.
Shirajgaon Band Deshmukh Wada
esakal
वाड्यात दरवर्षी गौरी-गणपती उत्सव आणि रामनवमी पारंपरिक पद्धतीने साजरी केली जाते. त्यामुळे घराला आजही जुन्या काळचा जिवंतपणा जाणवतो.
Shirajgaon Band Deshmukh Wada
esakal
प्रसिद्ध साहित्यिक गो. नी. दांडेकर यांनी या वाड्यात काही काळ मुक्काम केला होता. परिसराच्या अनुभवातून ‘पूर्णामायची लेकरं’ साकारली.
Shirajgaon Band Deshmukh Wada
esakal
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी या वाड्यात मुक्काम केला. त्यामुळे वास्तूला साहित्यिक आणि राजकीय आठवणींचाही वारसा लाभला आहे.
Shirajgaon Band Deshmukh Wada
esakal
विदर्भाच्या कडक उन्हाचा आणि पावसाचा विचार करून उतरत्या गॅलऱ्या, जाड भिंती आणि मध्यवर्ती अंगण अशी रचना करण्यात आली आहे.
Shirajgaon Band Deshmukh Wada
esakal
कोरीवकाम, लाकडी कलाकुसर, प्रशस्त अंगण आणि मजबूत बांधणी पाहिली की पूर्वजांची कल्पकता आणि वास्तुशास्त्राची जाण सहज लक्षात येते. ( सर्व फोटो - डॉ. तुकाराम मोटे)
Shirajgaon Band Deshmukh Wada
esakal
First rain on Earth, Earth first rainfall
esakal