Shubham Banubakode
आज आपण अनुभवतो तो पाऊस अब्जावधी वर्षांपूर्वीही पडला होता. वैज्ञानिकांच्या मते, पृथ्वीवर सुमारे ४ अब्ज वर्षांपूर्वी पावसाची सुरुवात झाली असावी.
First rain on Earth, Earth first rainfall,
esakal
त्या काळात पृथ्वी हिरवीगार नव्हती. सर्वत्र ज्वालामुखी, तापलेल्या खडकांचा प्रदेश आणि वाफेचं वातावरण होतं. माणूस, झाडं किंवा सजीव अस्तित्वात नव्हता.
First rain on Earth, Earth first rainfall,
esakal
ज्वालामुखींमधून मोठ्या प्रमाणात वाफ वातावरणात गेली. पृथ्वीचं तापमान हळूहळू कमी झालं आणि हीच वाफ ढगांमध्ये बदलली. त्यानंतर पाऊस पडू लागला.
First rain on Earth, Earth first rainfall,
esakal
ऑस्ट्रेलियातील जॅक हिल्स भागात अब्जावधी वर्षे जुन्या झिरकॉन स्फटिकांचा अभ्यास करण्यात आला. त्यातून पृथ्वीच्या सुरुवातीच्या इतिहासाची माहिती मिळाली.
First rain on Earth, Earth first rainfall,
esakal
झिरकॉन स्फटिकांमधील ऑक्सिजन आयसोटोपच्या अभ्यासातून ४ अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीवर गोडं पाणी आणि जलचक्र अस्तित्वात असल्याचे संकेत मिळाले.
First rain on Earth, Earth first rainfall,
esakal
सुरुवातीला पडलेलं पावसाचं पाणी खडक, खोलगट भाग आणि दऱ्यांमध्ये साचत गेलं. लाखो वर्षांच्या प्रक्रियेनंतर या पाण्यापासून समुद्र आणि महासागर तयार झाले.
First rain on Earth, Earth first rainfall,
esakal
हा पाऊस फक्त पाणी घेऊन आला नव्हता. याच पाण्यामुळे पृथ्वीवर जीवनासाठी आवश्यक वातावरण तयार होण्यास मदत झाली. पुढे सजीवसृष्टीचा जन्म शक्य झाला.
First rain on Earth, Earth first rainfall,
esakal
आज आपण ज्या पावसात भिजतो, त्याची सुरुवात पृथ्वीच्या अगदी सुरुवातीच्या काळात झाली होती.
First rain on Earth, Earth first rainfall,
esakal
putin
esakal