kimaya narayan
बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते म्हणजे अमरीश पुरी. अमरीश यांची लोकप्रियता अजूनही टिकून आहे.
बॉलिवूडच्या गाजलेल्या खलनायकांपैकी एक म्हणून अमरीश यांचं नाव घेतलं जात. त्यांनी साकारलेली मोगॅम्बोही भूमिका खूप गाजली.
पण वैयक्तिक आयुष्यातील अमरीश यांची लव्हस्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे. अमरीश यांनी एका मराठी मुलीशी लग्न केलं. तिचं नाव होतं उर्मिला दिवेकर.
उर्मिला आणि अमरीश यांची ओळख एका इंश्युरन्स कंपनीत झाली. अमरीश या इंश्युरन्स कंपनीत क्लार्क म्हणून नोकरी करत होते. पहिल्याच भेटीत त्यांची मैत्री झाली.
अमरीश आणि उर्मिला एकमेकांना आवडले आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
पण अमरीश आणि उर्मिला यांच्या लग्नाला दोघांच्याही घरातून विरोध होता. पण अमरीश यांच्या आईच्या मध्यस्थीमुळे त्यांचं लग्न झालं.
अमरीश आणि उर्मिला यांना राजीव आणि नम्रता पुरी ही दोन मुलं आहेत.