मुलीला थंडी वाजत होती म्हणून जाळले तब्बल 14 करोड रुपये; हा सणकी गुन्हेगार माहितीये का ?

kimaya narayan

गुन्हेगारी जगाचा बादशाह

गुन्हेगारी जगतात आजवर अनेक क्रूर गुन्हेगार होऊन गेले आहेत. पण या सगळ्यांचा बादशाह म्हणजे ड्रग्स माफिया, नार्कोटेरिस्ट आणि राजकारणी पाब्लो एस्कोबार.

Pablo Escobar

संपत्ती

पाब्लो फक्त गुन्हेगारीचं नाही तर त्याच्या अगणित संपत्तीसाठी प्रसिद्ध होता. पाब्लोकडे इतकी संपत्ती होती की ती ठेवायला तिजोऱ्या कमी पडत.

Pablo Escobar

मुलींसाठी जाळले 14 करोड

एकदा तर असं घडलं की,पाब्लोच्या मुलीला बर्फ पडल्यामुळे खूप थंडी वाजत होती.पाब्लोला लेकीची अवस्था पाहवली नाही. त्यावेळी त्याच्याकडे २ मिलियन डॉलर म्हणजे जवळपास चौदा करोड रुपये नगदी होते. ते त्याने काहीही न विचार करता जाळले कारण मुलीला उब मिळावी.

Pablo Escobar

उंदीर पैसे खायचे

पाब्लोकडे इतकी संपत्ती होती की पैसे ठेवण्यासाठी तिजोऱ्या कमी पडायच्या. तो पैसे गोदामांमध्ये गोण्यांमध्ये भरून ठेवायचा. पण तिथे काहीच सुरक्षा नसल्यामुळे वर्षभरात जवळपास १ अरब रुपये उंदीर खाऊन टाकायचे. फक्त पैशांच्या गड्ड्या बांधण्यासाठी तो 1000 डॉलरचे रबर बँड विकत घ्यायचा.

Pablo Escobar

संपत्ती

असं म्हटलं जातं पाब्लो दिवसाला 400 करोड रुपयांपेक्षा जास्त संपत्ती कमवायचा. फोर्ब्स मॅगझीननुसार त्याची एकूण संपत्ती 25 अरब डॉलर इतकी होती.

Pablo Escobar

ड्रग्सचा व्यापार

पाब्लोचा ड्रग्सचा वापर इतका वाढला होता की जगात 80% कोकेनचा व्यापार तो करायचा. तसेच त्याने पोलीस, न्यायाधीश, नेते अगदी पत्रकारांनाही विकत घेतलं होत. त्याच्यामुळे 15000 लोकांनी जीव गमावला होता.

Pablo Escobar

मृत्यू

२ डिसेंबर १ ९ ९ ३ ला पाब्लोचा मृत्यू झाला. काहींनी असं म्हटलं की त्याने स्वतःचा जीव घेतला तर काहींनी असं म्हटलं त्याच्या भावानेच त्याचा खून केला.

Pablo Escobar

सम्राट अकबराची लाडकी राणी कोण ?

Akbar
<strong>येथे क्लिक करा</strong>