मिलिंद गवळींची भावूक करणारी पोस्ट

Anuradha Vipat

अभिनेता मिलिंद गवळी

 ‘आई कुठे काय करते' या मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारणारा अभिनेता मिलिंद गवळी हा कायमच चर्चेत असतो. 

लक्ष वेधून घेतलं

नुकतीच मिलिंदने केलेली पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

व्हिडीओ शेअर

मिलिंद गवळीने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘मराठा बटालियन’ या चित्रपटाच्या सीनमधील व्हिडीओ शेअर केला आहे.

आठवणींना उजाळा

हा व्हिडीओ शेअर करत त्याने लक्ष्मीकांत बेर्डे, विजय चव्हाण आणि रमेश भाटकर यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे

"लक्ष्मीकांत बेर्डे, विजय चव्हाण, रमेश भाटकर. मराठी चित्रपट व नाट्य सृष्टीतले दिग्गज असे कलाकार, ज्यांच्याबरोबर मला काम करायला मिळालं. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबरोबर “मराठा बटालियन” मध्ये त्यांच्याबरोबर काम करायची संधी मिळाली असंही मिलिंदने या व्हिडीओत म्हटलं आहे

कमेंट

मिलिंद गवळी यांच्या या पोस्टवर लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे याने कमेंट केली आहे.

अमिताभ बच्चन यांना यंदाचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रदान