सकाळ डिजिटल टीम
डॉ.आनंदी गोपाळ जोशी भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा मान पटकावणाऱ्या आणि प्रेरणादायी व्यक्ती आहेत.
आनंदी गोपाळ जोशी यांचा जन्म 31 मार्च 1865 ला कल्याण येथे झाला. वयाच्या 9 व्या वर्षी गोपाळ जोशी यांच्याशी विवाह झाला.
आनंदीबाईंना वयाच्या 14 व्या वर्षी बाळ झाला, पण दुर्दैवाने त्याचं 10 व्या दिवशी निधन झालं.
बाळाच्या निधनाने आनंदीबाईला अत्यंत धक्का बसला आणि तिने डॉक्टर होण्याचा निर्धार केला.
गोपाळ जोशी यांनी आनंदीबाईसाठी शिक्षणाची संधी मिळवण्यासाठी वेगवेगळ्या प्रयत्नांची सुरवात केली.
आनंदीबाईंना इंग्रजी आणि संस्कृत शिकण्याची संधी मिळाली आणि त्यांच्या शिक्षणाची गाडी सुरू झाली.
अमेरिकेतील वैद्यकीय कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याची अट होती, पण गोपाळ जोशी यांनी मोठ्या प्रयत्नांनी आनंदीबाईला प्रवेश मिळवून दिला.
1886 मध्ये आनंदीबाईला एमडी पदवी मिळाली, आणि त्यांनी प्रसूतीशास्त्रावर प्रबंध सादर केला.
अमेरिकेतून परतल्यानंतर आनंदीबाईला क्षयरोग झाला आणि 26 फेब्रुवारी 1887 ला वयाच्या 20 व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला.
आनंदी गोपाळ जोशींनी आपल्या मेहनत आणि कर्तृत्वाने प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आणि भारतीय महिलांना डॉक्टर होण्याची प्रेरणा दिली.