सकाळ वृत्तसेवा
गणपतीचे विसर्जन 11 दिवसांनी अनंत चतुर्दशीला केले जाते. पण, गपणतीचे विसर्जन का केले जाते यामागचं शास्त्र तुम्हाला माहिती आहे का?
यासंदर्भात काही पौराणिक कथा प्रचलित आहे. असं सांगितलं जातं की, भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशाचा जन्म झाला होता.
या दिवशी महर्षी वेद व्यास यांनी महाभारताची रचना करण्यास सुरुवात केली. महाभारत लिहिण्यासाठी त्यांनी गणेशाची प्रार्थना केली.
सलग १० दिवस गणपती महाभारत लिहिण्याचे काम करत होते. अनंत चतुर्दशीच्या दिवशी महाभारत लिहिण्याचे काम झाल्यानंतर गणेश थकव्यामुळे मूर्च्छित पडले होते.
अजिबात हालचाल न केल्याने आणि अंगावर धूळ-माती साचली असल्याने गणेशाला सरस्वती नदी स्नान घालण्यात आले.
नदीत स्थान घालून गणपतीच्या अंगावरील धूळ, माती साफ करण्यात आली होती. म्हणूनच गणपतीची स्थापना १० दिवस केली जाते.
असे असले तरी गणपतीचे विसर्जन दीड, पाच, सात आणि दहाव्या दिवशी केले जाते