Varsha Balhe
नांदेड जिल्ह्यातील होट्टल गावाला त्याच्या प्राचीन मंदिरांमुळे आणि शिल्पसंपदेमुळे 'मिनी हम्पी' म्हणून ओळखले जाते.
A 1000-Year-Old Historical Village Mini Hampi in Maharashtra
esakal
11व्या शतकात या गावाला 'पोटलनगरी' म्हणून ओळखले जात होते. कल्याणीच्या चालुक्य राजांची ही महत्त्वाची उपराजधानी होती.
A 1000-Year-Old Historical Village Mini Hampi in Maharashtra
esakal
महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा या तीन राज्यांच्या सीमेवर वसलेले हे गाव ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
A 1000-Year-Old Historical Village Mini Hampi in Maharashtra
esakal
होट्टलमध्ये 300 पेक्षा जास्त जीवनआकारातील शिल्पे आणि 80 हून अधिक कोरीव दृश्ये आजही पाहायला मिळतात.
A 1000-Year-Old Historical Village Mini Hampi in Maharashtra
esakal
येथील वास्तुकला आणि दगडी शिल्पांची भव्यता पाहून अनेकजण या गावाची तुलना कर्नाटकातील प्रसिद्ध हम्पीशी करतात.
A 1000-Year-Old Historical Village Mini Hampi in Maharashtra
esakal
सिद्धेश्वर, रेब्बेश्वर, सोमेश्वर आणि परमेश्वर ही चार प्रमुख मंदिरे या गावाच्या ऐतिहासिक ओळखीचा भाग आहेत.
A 1000-Year-Old Historical Village Mini Hampi in Maharashtra
esakal
पुरातत्त्व विभागाने सिद्धेश्वर मंदिराचा प्रत्येक दगड क्रमांक देऊन पुन्हा मूळ स्वरूपात उभारला. हा भारतातील दुर्मिळ वास्तुशास्त्रीय प्रयोग मानला जातो.
A 1000-Year-Old Historical Village Mini Hampi in Maharashtra
esakal
1000 वर्षांचा इतिहास, शेकडो शिल्पे आणि भव्य मंदिरे… त्यामुळेच नांदेडमधील होट्टल गावाला आज 'महाराष्ट्राचं मिनी हम्पी' म्हटलं जातं.
A 1000-Year-Old Historical Village Mini Hampi in Maharashtra
esakal