प्राचीनकाळी टोलनाके नव्हते, तर कर कसा वसूल केला जायचा?

Aarti Badade

नाणेघाट

आज नाणेघाट म्हटलं की डोळ्यांसमोर येतो सह्याद्रीतील ऐतिहासिक घाटमार्ग! पण तुम्हाला माहिती आहे का, प्राचीन काळात याच मार्गावरून जाणाऱ्या व्यापाऱ्यांकडून जकात म्हणजेच कर वसूल केला जात असे? जाणून घेऊया यामागचा रंजक इतिहास!

Ancient Tax System naneghat

|

Sakal

सातवाहन काळात होता महत्त्वाचा व्यापारी मार्ग!

सातवाहन राजवटीच्या काळात नाणेघाट हा कोकणातील बंदरे आणि दख्खनच्या पठारावरील व्यापारी शहरांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग होता. कल्याण, सोपारा, जुन्नर आणि पैठण यांसारख्या व्यापारी केंद्रांना जोडण्यात या घाटाची महत्त्वाची भूमिका होती.

Ancient Tax System naneghat

|

Sakal

व्यापाऱ्यांकडून वसूल केला जायचा कर!

या घाटातून प्रवास करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून त्यांच्या मालावर जकात किंवा टोल स्वरूपात कर घेतला जात असल्याचे मानले जाते. हा कर नाण्यांच्या स्वरूपात जमा केला जात असे, अशी ऐतिहासिक माहिती सांगितली जाते.

Ancient Tax System naneghat

|

Sakal

नाणेघाटात आजही पाहायला मिळतो दगडी रांजण!

नाणेघाटातील गुहेजवळ दगडात कोरलेला एक मोठा रांजण पाहायला मिळतो. व्यापाऱ्यांकडून जमा होणारी नाणी किंवा कर ठेवण्यासाठी या रांजणाचा वापर केला जात असावा, अशी ऐतिहासिक शक्यता व्यक्त केली जाते.

Naneghat trade route

|

Sakal

म्हणून पडले नाणेघाट नाव?

'नाणे' आणि 'घाट' या दोन शब्दांपासून नाणेघाट हे नाव तयार झाल्याचे प्रचलित मत आहे. व्यापाऱ्यांकडून नाण्यांच्या स्वरूपात कर वसूल केला जात असल्यामुळे या मार्गाला हे नाव पडले, असे सांगितले जाते.

Ancient Tax System naneghat

|

Sakal

राणी नागनिकांचा शिलालेख आहे खास आकर्षण!

नाणेघाटातील गुहेत सातवाहन काळातील राणी नागनिका यांचा प्रसिद्ध ब्राह्मी लिपीतील शिलालेख आहे. या शिलालेखातून सातवाहन राजघराणे, धार्मिक विधी आणि तत्कालीन इतिहासाची महत्त्वपूर्ण माहिती मिळते.

Ancient Tax System naneghat

|

Sakal

नाणेघाट म्हणजे प्राचीन व्यापाराचा ऐतिहासिक पुरावा!

नाणेघाट हा केवळ डोंगरातून जाणारा मार्ग नव्हता, तर कोकण आणि दख्खनला जोडणारा महत्त्वाचा व्यापारी दुवा होता. येथील गुहा, शिलालेख आणि दगडी रांजण आजही प्राचीन व्यापारव्यवस्थेची आठवण करून देतात.

Ancient Tax System naneghat

|

Sakal

शिवरायांच्या इतिहासाशी नातं सांगणाऱ्या हडसर किल्ल्याचं प्रवेशद्वार पाहिलंय का?

, Hadsar Fort History

|

Sakal

येथे क्लिक करा