शिवरायांच्या इतिहासाशी नातं सांगणाऱ्या हडसर किल्ल्याचं प्रवेशद्वार पाहिलंय का?

Aarti Badade

हडसर किल्ला

जुन्नर तालुक्यात डोंगररांगांमध्ये वसलेला हडसर किल्ला आपल्या वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यकलेसाठी प्रसिद्ध आहे.

, Hadsar Fort History

|

Sakal

हडसर किल्ल्याला पर्वतगड असेही म्हणतात!

हडसर किल्ल्याला पर्वतगड या नावानेही ओळखले जाते. निसर्गरम्य परिसरात असलेल्या या किल्ल्याला ऐतिहासिक आणि भौगोलिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे.

, Hadsar Fort History

|

Sakal

अखंड खडकात कोरलेले प्रवेशद्वार!

हडसर किल्ल्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे कातळात कोरलेले प्रवेशद्वार. बोगद्यासारखी रचना असलेल्या या प्रवेशद्वारासोबतच पहारेकऱ्यांच्या खोल्याही पाहायला मिळतात.

, Hadsar Fort History

|

Sakal

नाणेघाट व्यापार मार्गाच्या संरक्षणासाठी महत्त्वाचा!

प्राचीन काळात नाणेघाट मार्गे व्यापाराची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असे. या व्यापारी मार्गाच्या संरक्षणासाठी हडसर किल्ल्याची उभारणी झाल्याचे सांगितले जाते.

Hadsar Fort History

|

Sakal

शिवरायांच्या इतिहासाशीही आहे संबंध!

हडसर किल्ल्याचा उल्लेख १६३७ मध्ये शहाजीराजे आणि मुघल यांच्यात झालेल्या तहाच्या संदर्भात आढळतो. पुढे स्वराज्याच्या इतिहासातही या किल्ल्याला महत्त्व प्राप्त झाले. १८१८ मध्ये ब्रिटिशांनी हा किल्ला ताब्यात घेतला.

Hadsar Fort History

| Esakal

किल्ल्यावर पाहायला मिळतात प्राचीन वास्तू!

हडसर किल्ल्यावर महादेवाचे मंदिर, पाण्याचे तलाव, पाण्याची टाकी, कोठारे आणि लेणी पाहायला मिळतात. महादेव मंदिरात गणेश, गरुड आणि हनुमान यांच्या कोरीव मूर्तीही आहेत.

Hadsar Fort History

|

Sakal

किल्ल्यावर जाण्यासाठी आहेत दोन मार्ग!

हडसर किल्ल्यावर जाण्यासाठी दोन वेगवेगळे मार्ग आहेत. दक्षिणेकडील मार्ग तुलनेने सोपा असून मुख्य प्रवेशद्वारातून जातो. तर पूर्वेकडील आणि उत्तरेकडील बाजूचा मार्ग अधिक थरारक असून त्यात कातळ चढाईचा अनुभव मिळतो.

Hadsar Fort History

|

Sakal

हडसर किल्ला एकदा नक्की पाहा!

अखंड कातळात कोरलेले प्रवेशद्वार, प्राचीन स्थापत्यकला आणि ऐतिहासिक वारसा यामुळे हडसर किल्ला दुर्गप्रेमींसाठी खास आकर्षण आहे.

Hadsar Fort History

|

Sakal

ताम्हिणी घाट ते सिंहगड किल्ला! किती आहे अंतर? जाणून घ्या प्रवासाचे 3 मार्ग

Tamhini Ghat to Sinhagad Fort

|

Sakal

येथे क्लिक करा