Aarti Badade
बिहारमधील नालंदा हे प्राचीन भारतातील प्रसिद्ध शिक्षणकेंद्र होते. येथे भारतासह अनेक देशांमधून विद्यार्थी ज्ञानार्जनासाठी येत असत.
Ancient Nalanda University
Sakal
नालंदामध्ये महायान, हीनयान, शून्यवाद आणि विज्ञानवाद यांसारख्या बौद्ध तत्त्वज्ञानाच्या विविध शाखांचा अभ्यास केला जात असे.
Ancient Nalanda University
Sakal
विद्यार्थ्यांना संस्कृत व्याकरण, शब्दशास्त्र, साहित्य आणि भाषेच्या विविध पैलूंचे शिक्षण दिले जात असे.
Ancient Nalanda University
sakal
तर्कशास्त्र, प्रमाणमीमांसा आणि विविध तत्त्वज्ञानांचा अभ्यास येथे महत्त्वाचा होता. विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची परीक्षा वादविवादांच्या माध्यमातूनही घेतली जात असे.
Ancient Nalanda University
Sakal
नालंदामध्ये वैद्यकशास्त्र, आयुर्वेद आणि योग यांसारख्या विषयांचाही अभ्यास केला जात होता. त्यामुळे शिक्षण केवळ धर्मापुरते मर्यादित नव्हते.
Ancient Nalanda University
Sakal
गणित, खगोलशास्त्र, ज्योतिष, वेद-वेदांगे आणि शिल्पकलेशी संबंधित विषयांचाही अभ्यास केला जात असे.
Ancient Nalanda University
Sakal
बौद्ध तत्त्वज्ञानापासून गणित आणि वैद्यकशास्त्रापर्यंत विविध विषयांचे शिक्षण देणारे नालंदा हे प्राचीन भारतातील समृद्ध ज्ञानपरंपरेचे प्रतीक होते.
Ancient Nalanda University
Sakal
Gingee Fort
Sakal