Aarti Badade
'दक्षिणेचा तख्त' म्हणून ओळखला जाणारा जिंजीचा भव्य किल्ला महाराष्ट्रात नसून तामिळनाडूतील विल्लुपुरम जिल्ह्यात आहे.
Gingee Fort
ESakal
१६७७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहिमेदरम्यान जिंजीचा किल्ला आपल्या ताब्यात घेतला.
Gingee Fort
ESakal
मुघलांच्या आक्रमणाच्या काळात छत्रपती राजाराम महाराजांनी जिंजी किल्ल्यावरून स्वराज्याचा कारभार सांभाळला. त्यामुळे या किल्ल्याला स्वराज्याची तिसरी राजधानी म्हणूनही ओळखले जाते.
Gingee Fort
ESakal
राजगिरी, कृष्णगिरी आणि चंदरायदुर्ग या तीन डोंगरांवर जिंजी किल्ल्याची तटबंदी आणि संरक्षण व्यवस्था उभारण्यात आली आहे.
Gingee Fort
ESakal
किल्ल्याची भव्य रचना, मजबूत तटबंदी आणि नैसर्गिक संरक्षण पाहून ब्रिटिशांनी त्याला 'ट्रॉय ऑफ द ईस्ट' म्हणजेच 'पूर्वेकडील ट्रॉय' असे संबोधले.
Gingee Fort
ESakal
'मराठा मिलिटरी लँडस्केप्स ऑफ इंडिया' या जागतिक वारसा स्थळांच्या समूहात जिंजी किल्ल्याचा समावेश करण्यात आला आहे.
Gingee Fort
ESakal
शिवरायांच्या दक्षिण मोहिमेपासून राजाराम महाराजांच्या संघर्षापर्यंत जिंजी किल्ल्याने मराठ्यांच्या इतिहासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
Gingee Fort
ESakal
Shivaji Maharaj Krishna Horse
Sakal