Shubham Banubakode
प्राचीण काळात आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान नव्हते. त्याकाळी गर्भनिदान करण्यासाठी शारीरिक लक्षणे आणि पारंपरिक पद्धतींवर अवलंबून राहायचे.
गर्भधारणेचे सर्वात सामान्य लक्षण म्हणजे मासिक पाळी थांबणे. अनुभवी सुईण किंवा कुटुंबातील स्त्रिया यावर लक्ष ठेवत असत.
स्तनांमध्ये संवेदनशीलता, मळमळ, थकवा किंवा वारंवार लघवी होणे ही लक्षणे गर्भधारणेची सूचक मानली जात.
इजिप्तमध्ये, स्त्रीला गव्हाच्या आणि बार्लीच्या बियाण्यांवर लघवी करण्यास सांगितले जाई. बियाणे उगवल्यास गर्भधारणा मानली जाई.
जर बार्ली उगवली तर मुलगा, गव्ह उगवले तर मुलगी, आणि जर काहीच उगवले नाही तर गर्भधारणा नसल्याचे समजले जाई.
अनुभवी सुईणी शारीरिक बदलांचे बारकाईने निरीक्षण करत आणि गर्भधारणेची पुष्टी करत. त्यांचा अनुभव हा मुख्य आधार होता.
गर्भवती स्त्रीच्या त्वचेचा रंग, भूक वाढणे किंवा विशिष्ट अन्नाची इच्छा यावरूनही गर्भधारणा ओळखली जाई.
काही महिन्यांनंतर पोटाचा वाढता आकार हा गर्भधारणेचा स्पष्ट संकेत होता, परंतु यासाठी वेळ लागत असे.
काही संस्कृतींमध्ये गर्भधारणा पुष्टी करण्यासाठी धार्मिक विधी किंवा देवतांचे आशीर्वाद घेतले जात.