मंगळावर सापडली सोन्याची खाण, अद्भुत फोटो एकदा बघाच

Saisimran Ghashi

मार्सवरील 'सोनेरी खजिना'

नासाच्या रोव्हरने Witch Hazel Hill येथे दुर्लभ खडकांच्या थरांचा शोध लावून एक प्रकारची "सोनेरी खाण" जगासमोर आणली आहे हे थर आतापर्यंत कधीच पाहिले गेले नव्हते.

Mars Gold mine discovery NASA Rover | esakal

संशोधन मोहीम

फक्त चार महिन्यांत रोव्हरने ५ नमुने गोळा केले, ७ खडक तपासले आणि ८३ वर लेझरने विश्लेषण केले. ही त्याची सर्वात फास्ट वैज्ञानिक मोहीम होती.

Mars Gold mine discovery NASA Rover | esakal

३.९ अब्ज वर्षांपूर्वीचा इतिहास

सापडलेले काही खडक मंगळाच्या Noachian कालखंडातील आहेत. जेव्हा उल्का पडत होत्या, ज्वालामुखी होते आणि पाणी वाहण्याची शक्यता होती.

Mars Gold mine discovery NASA Rover | esakal

खोल थरांचा अभ्यास

काही खडक मार्सच्या हिंसक उल्कापातांच्या वेळी बाहेर फेकले गेले असावेत. ज्यामुळे संशोधकांना ग्रहाच्या आतील खोल थरांचा अभ्यास करता येतो.

Mars Gold mine discovery NASA Rover | esakal

‘सिल्व्हर माउंटन’चा दुर्मीळ नमुना

एका विशिष्ट नमुन्यात दुर्मिळ पोत आणि वयाच्या खूणा आहेत. यामुळे तो मंगळावरील प्राचीन काळातील एक अनोखा ठेवा मानला जातो.

Mars Gold mine discovery NASA Rover | esakal

पाण्याचे संकेत

जवळील सर्पेंटाइनने समृद्ध खडक सूचित करतो की पूर्वी पाण्याने खडकांवर परिणाम केला असावा. या प्रक्रियेत हायड्रोजन वायू निर्माण होतो, जो जीवसृष्टीसाठी इंधन ठरू शकतो.

Mars Gold mine discovery NASA Rover | esakal

जीवनाची शक्यता?

जरी जीवनाचे थेट पुरावे सापडले नसले, तरी काही रासायनिक प्रक्रियांमुळे प्राचीन काळी जीवनासाठी योग्य परिस्थिती निर्माण झाली असण्याची शक्यता आहे.

Mars Gold mine discovery NASA Rover | esakal

'ग्रीन गार्डन्स’ नमुना सुरक्षित

सर्व तांत्रिक अडचणींवर मात करून, रोव्हरने अत्यंत महत्त्वाचा "Green Gardens" नमुना यशस्वीरित्या सील केला आहे,जो भविष्यात पृथ्वीवर परत आणला जाईल.

Mars Gold mine discovery NASA Rover | esakal

प्रतीक्षा आणखी वाढली

Mars Sample Return मोहिमेत अडथळे आल्यामुळे, हे नमुने 2040 नंतरच पृथ्वीवर पोहोचू शकतील.

Mars Gold mine discovery NASA Rover | esakal

भविष्यातील शोध

ह्या मोहिमेने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की आपण मंगळाच्या गुप्त इतिहासाच्या अगदी जवळ पोहोचत आहोत. भविष्यातील शोध आणखी थरारक असणार आहेत.

Mars Gold mine discovery NASA Rover | esakal

'हे' 5 पदार्थ जास्त खाणाऱ्यांना हृदयाच्या आजाराचा धोका जास्त असतो!

food meals causes to heart disease | esakal
येथे क्लिक करा