संतोष कानडे
विज्ञानाच्या युगातही लोक प्राचीन भारतातील गुप्त विद्येविषयी आकर्षण बाळगतात.
गुप्तविद्येपैकी एक असलेल्या तंत्रविद्येचा उगम सुमारे १५०० ते २००० वर्षांपूर्वी झाल्याचे मानले जाते.
या विद्येचा संबंध मंत्र, यंत्र, ध्यान आणि विशिष्ट धार्मिक विधींशी जोडला जातो. आजही काही लोक याबाबत दावा करतात.
तंत्रविद्येचा मुख्य उद्देश आध्यात्मिक उन्नती, आत्मज्ञान आणि मनावर नियंत्रण मिळवणे हा होता.
प्राचीन काळात काही साधक निर्जन गुहा, स्मशानभूमी किंवा मंदिरांमध्ये तंत्रसाधना करत असत.
तंत्रशास्त्रात विविध प्रकारचे यंत्र वापरले जात, त्यापैकी श्रीयंत्र सर्वात प्रसिद्ध मानले जाते.
अनेक लोक तंत्रविद्येला जादूटोणा समजतात, परंतु मूळ तंत्रशास्त्र हे आध्यात्मिक साधनेवर आधारित असल्याचा दावा केला जातो.
तंत्रविद्येद्वारे अलौकिक शक्ती मिळतात, असे लोकविश्वास आहेत; मात्र याला वैज्ञानिक पुरावा नाही.
इतिहासकारांच्या मते, तंत्रविद्या ही प्राचीन भारतीय अध्यात्म, मानसशास्त्र आणि धार्मिक परंपरांचा एक महत्त्वाचा भाग आहे.