संतोष कानडे
औरंगजेबाचा मृत्यू ३ मार्च १७०७ रोजी अहिल्यानगरजवळील भिंगार छावणीत झाला.
औरंगजेबच्या मृत्यूनंतर सापडलेल्या वैयक्तिक वस्तूंविषयी माहिती समकालीन फारसी नोंदी आणि त्याच्या पत्रांमधून मिळते.
लोकप्रिय कथांनुसार मुघल सम्राट औरंगजेबाच्या जवळ मोठा खजिना, दागिने किंवा राजेशाही संपत्ती नव्हती.
औरंगजेबाने स्वतःच्या खर्चासाठी टोपी शिवणे आणि कुराणाच्या हस्तलिखित प्रती लिहिणे हे काम केल्याचा उल्लेख आढळतो.
या कामातून मिळालेल्या पैशांतूनच त्याच्या दफनविधीचा खर्च करावा, अशी त्याची इच्छा होती.
काही ऐतिहासिक नोंदीनुसार त्याच्याकडे अत्यंत कमी रक्कम शिल्लक होती, जी त्याच्या वैयक्तिक कमाईतून जमा झाली होती.
औरंगजेबच्या मृत्यूनंतर 'खिशात पैसे' किंवा 'गुप्त खजिना मिळाला' अशा कथांना विश्वसनीय ऐतिहासिक आधार नाही.
औरंगजेबाने आपल्या अखेरच्या पत्रांत सांसारिक वैभवाबद्दल निराशा आणि जीवनाच्या क्षणभंगुरतेचा उल्लेख केला आहे.
औरंगजेबची कबरही अतिशय साधी असून ती छत्रपती संभाजी नगर येथील खुलदाबाद येथे आहे.