Anuradha Vipat
'पुष्पा २: द रूल' चित्रपटाच्या रिलीजची उत्सुकता सर्वत्र आहे.
अॅडव्हान्स बुकिंगमध्ये मिळालेल्या प्रतिसादामुळे चित्रपट मोठी कमाई करेल अशी आशा निर्माण झाली आहे
हैदराबादमध्ये एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये अल्लू अर्जुन भावूक झाला असून त्याला अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळालं आहे .
या कार्यक्रमात ‘पुष्पा 2: द रुल’चे दिग्दर्शक सुकुमार यांनी सगळ्यांसमोर अल्लू अर्जुनचे तोंड भरून कौतुक केले.
हे ऐकून अल्लू अर्जुन इतका भावूक झाला की त्याला अश्रू अनावर झाले.
सुकुमार अल्लू अर्जुनचे कौतुक करताना म्हणाले की,‘‘एक गोष्ट निश्चित आहे: माझा प्रवास आर्यापासून सुरू झाला. मी बनीला वर्षानुवर्षे कठोर परिश्रम करून पुढे जाताना पाहिले आहे, त्याची मेहनत जवळून पाहिली आहे.
पुढे ते म्हणाले की,‘‘आज पुष्पा ज्या ठिकाणी आहे तर ते अल्लू अर्जुनवरील माझ्या प्रेमामुळे आहे. अल्लू अर्जुन हा चित्रपट मी तुझ्यासाठी बनवला आहे