Mansi Khambe
देशभरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पण भारतातील एका जिल्ह्यात पावसानंतर लाखो रुपयांचे हिरे सापडले आहेत.
आंध्र प्रदेशातील कुर्नूल जिल्ह्यात एका महिलेला १७ लाख रुपयांचा हिरा सापडल्याचे समोर आले आहे.
कुर्नूल जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाऊस पडल्यानंतर मातीचा थर साफ होतो. तेव्हा लोकांना तिथे मौल्यवान दगड दिसतात.
कुर्नूल जिल्ह्यात अनेक मोठ्या खाणी आहेत. पावसानंतर, जेव्हा पाणी मातीचे अनेक थर वाहून जाते तेव्हा मौल्यवान दगड दिसू लागतात.
देशभरातील शेतकरी पिकांसाठी आपली शेतं तयार करण्यास सुरुवात करतात. कुर्नूल जिल्ह्यात, मोठ्या संख्येने लोक शेतात मौल्यवान दगड शोधू लागतात.
आजूबाजूच्या जिल्ह्यांतील लोकही पावसाळ्यात या गावांमध्ये तात्पुरते राहण्यासाठी येतात. आतापर्यंत अनेकांना याठिकाणी मौल्यवान दगड सापडले आहेत. तर त्यांनी ते हिऱ्यांच्या दुकानात विकून भरपूर पैसे कमवले आहेत.
आकाशातून हिऱ्यांच्या पाऊस पडणे ही गोष्ट अशक्य आहे. एका सर्वेक्षणानुसार, कुर्नूल आणि अनंतपूर जिल्ह्यांमध्ये खडकांचे अस्तित्व आहे. यामुळे पावसाळ्यानंतर लोकांना येथे हिरे सापडतात.