अँड्रॉईड यूजर्सना मोठा धोका; नवा मालवेअर आला समोर

Sudesh

अँड्रॉईड

जगभरात कित्येक लोक अँड्रॉईड स्मार्टफोन वापरतात. या सर्वांसाठी धोक्याची बातमी आहे.

Android Malware | eSakal

व्हायरस

सायबर सिक्युरिटी तज्ज्ञांना नुकताच एक नवा मालवेअर मिळाला आहे.

Android Malware | eSakal

XLoader

एक्स लोडर असं नाव असलेला हा मालवेअर यूजर्सची सर्व माहिती अगदी शिताफीने चोरू शकतो.

Android Malware | eSakal

धोका

यासोबतच हा मालवेअर एकदा स्मार्टफोनमध्ये शिरला, तर हॅकर्स याच्या मदतीने नवीन अ‍ॅप्स देखील फोनमध्ये इन्स्टॉल करू शकतात.

Android Malware | eSakal

एसएमएस

हा मालवेअर यूजर्सचे एसएमएस देखील वाचू शकतो, त्यामुळे मेसेजवर आलेले पासवर्ड आणि ओटीपी हॅकर्सना सहज मिळू शकतात.

Android Malware | eSakal

खबरदारी

हा मालवेअर कितीतरी फोनच्या सिक्युरिटी फायरवॉल ओलांडू शकत असल्यामुळे, खबरदारी घेणं गरजेचं आहे.

Android Malware | eSakal

अ‍ॅप्स

हा मालवेअर विविध अ‍ॅप्सच्या माध्यमातून फोनमध्ये शिरत होता. गुगलने असे अ‍ॅप्स काढून टाकले आहेत. मात्र, थर्ड पार्टी अ‍ॅप्समध्ये हा मालवेअर असू शकतो, असं गुगलने म्हटलं आहे.

Android Malware | eSakal

खबरदारी

यामुळे, कोणत्याही थर्ड पार्टी वेबसाईटवरुन नवीन अ‍ॅप्स घेऊ नका, किंवा संशयास्पद लिंक्सना क्लिक करू नका असं आवाहन गुगलने केलं आहे.

Android Malware | eSakal

सायबर सुरक्षेसाठी महत्त्वाच्या टिप्स!

Internet Security Tips | eSakal