सायबर सुरक्षेसाठी महत्त्वाच्या टिप्स!

Sudesh

इंटरनेट

आजचं युग हे तंत्रज्ञानाचं युग म्हटलं जातं. सध्याच्या जगात जेवढा इंटरनेटचा वापर वाढला आहे, तेवढेच इंटरनेटवरील धोकेही वाढले आहेत.

Internet Security Tips | eSakal

सुरक्षा

इंटरनेटवरील सुरक्षेसाठी फेब्रुवारीतील दुसरा मंगळवार हा इंटरनेट सेफ्टी दिवस म्हणून साजरा केला जातो.

Internet Security Tips | eSakal

टिप्स

यानिमित्ताने सायबर सुरक्षेबाबत काही टिप्स आम्ही तुम्हाला देणार आहोत..

Internet Security Tips | eSakal

कनेक्शन

सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध असणारं वायफाय वापरताना खबरदारी घेणं गरजेचं आहे. अशा वेळी इंटरनेट सर्फिंगसाठी व्हीपीएनची मदत घेणं फायद्याचं ठरू शकतं.

Internet Security Tips | eSakal

पासवर्ड

आजकाल तुमची बँकिंगपासून खासगी माहिती देखील ऑनलाईन उपलब्ध असते. त्यामुळे आपला पासवर्ड सेट करताना तो अगदीच सोपा असू नये याची खबरदारी घ्या.

Internet Security Tips | eSakal

अपडेट

तुमच्या डिव्हाईसचे सॉफ्टवेअर, सिक्युरिटी पॅचवर्क आणि ब्राऊजिंग अ‍ॅप्स हे नियमितपणे अपडेट करणं गरजेचं आहे.

Internet Security Tips | eSakal

लिंक्स

विविध प्रकारची आमिषं दाखवणारे मेसेज, किंवा गुगलवर उपलब्ध असणाऱ्या खोट्या वेबसाईट्स या माध्यमातून हॅकर्स तुमच्या फोनमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करण्यापूर्वी दोन वेळा विचार करा.

Internet Security Tips | eSakal

सुरक्षा

सध्या कित्येक वेबसाईट्सवर टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन सुविधा मिळते. यामुळे तुम्हाला लॉगइन करण्यासाठी केवळ पासवर्डच नाही, तर ओटीपीची देखील मदत घ्यावी लागते. यामुळे तुम्हाला अधिक सुरक्षा मिळते.

Internet Security Tips | eSakal

अँटीव्हायरस

तुमच्या डिव्हाईसमधील बेसिक सिक्युरिटी लेअर पुरेशी ठरेलच असं नाही. त्यामुळे एखाद्या चांगल्या कंपनीचे अँटीव्हायरस सॉफ्टवेअर घेणं गरजेचं आहे.

Internet Security Tips | eSakal

ऑनलाईन फसवणूक झाल्यावर कुठे अन् कशी तक्रार कराल?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyber Crime Complaint | eSakal